जगातील बर्याच देशांनी गेल्या काही वर्षांमध्ये साखर पेयांवर कर लावला आहे. आता या पावलावर पाऊल टाकून रोमानियन सरकार साखर पेेयांवर कर लागू करण्याच्या विचारात आहे. अहवालानुसार, साखर पेयांवर कर लागू करण्यासंदर्भात सरकारची पुढच्या आठवड्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.
साखर पेयांवर कर सुरू झाल्यास त्याचा परिणाम देशातील साखर वापरावर होण्याची शक्यता आहे. साखरेचा वापर कमी व्हावा आणि चांगल्या आणि निरोगी जीवनाला चालना मिळावी हे यासाठी या योजनेचे उद्दिष्ट आहे.
सप्टेंबरपासून कर लागू करण्यात येणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्या अनुषंगाने देशातील ग्राहकांना साखरयुक्त पेयांसाठी जास्त पैसे द्यावे लागतील. प्रति 100 मिलीलीटर 5 ते 8 ग्रॅम साखर असलेल्या पेयांसाठी कर प्रतिलिटर रॉन 0.8 असेल, तर दर 100 मि.ली. 8 ग्रॅमपेक्षा जास्त साखर असलेल्या पेयांसाठी कर 1 रॉन असेल.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.