रुड़की : लिब्बरहेड़ी साखर कारखान्याने हंगामात खरेदी केलेल्या सर्व उसाचे पैसे विभागाकडे पाठवले आहेत. लिब्बरहेडी कारखान्याने १०.३० कोटी रुपये ऊस विभागाला दिले आहेत. एवढेच पैसे कारखान्याला केंद्र सरकारकडून अनुदानाच्या रुपात मिळणार आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी ऊस बिले देण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये शासनाने सर्व कारखान्यांना लवकरात लवकर पैसे देण्याचे निर्देश दिले होते. लिब्बरहेडी साखर कारखान्यावर २१ कोटी रुपयांची थकबाकी होती. साखर कारखान्याचे महा व्यवस्थापक अनिल कुमार सिंह यांनी सांगितले की, साखर कारखान्याकडून बुधवारी जिल्ह्यातील तीन ऊस समित्यांना १०.३० कोटी रुपये दिले आहेत. या पैशातून सात एप्रिलपर्यंतखरेदी केलेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत. त्यांनी सांगितले की केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्यावतीने कारखान्याला १०.३० कोटी रुपयांचे अनुदान येणेबाकी आहे. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येतील. लवकरच हे पैसेही मिळतील अशी अपेक्षा आहे.
रुकडीच्या इकबालपूर कारखान्याने शेतकऱ्यांचे १८० कोटी रुपये थकवले आहेत. पैसे मिळाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. अनेकवेळा शेतकऱ्यांनी आंदोलने केली आहेत. आतापर्यंत न्यायालयाने ३१ मार्च २०२१ पर्यंत पूर्ण पैसे देण्याचे निर्देश दिले होते. मात्र, शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत. इकबालपूर कारखान्याकडे १८० कोटी रुपये, लक्सर कारखान्याकडे ३३ कोटी रुपये थकीत आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link