बांबूपासून इथेनॉल उत्पादनासाठी गुंतवणूक होणार: मंत्री रामेश्वर तेली

तिनसुकिया : डिगबोई रिफायनरीचा विस्तार केला जाईल अशी घोषणा केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस राज्य मंत्री रामेश्वर तेली यांनी केली. यासाठी जवळपास ७४० कोटी रुपये खर्च केले जातील आणि ०.६५ मिलियन मेट्रिक टन प्रती वर्ष (एमएमटीपीए) पासून १ एमएमटीपीएपर्यंत क्षमतेचा विस्तार केला जाईल. योजना ऑक्टोबर २०२५ पर्यंत चालू होईल अशी अपेक्षा आहे. नुमालीगढ़ रिफायनरी लिमिटेडच्या (एनआरएल) विस्तार योजनेबाबत केंद्रीय राज्यमंत्री म्हणाले की, रिफायनरी १,५०० कोटी रुपये खर्चून इथेनॉल प्लांट स्थापन करेल.

अप्पर आसाममध्ये १२ बांबू चिपिंग युनिट आणि सादियामध्ये एक युनिट स्थापन केले जाईल. हे युनिट एनआरएल आणि फिनिश कंपन्या यांदरम्यानच्या संयुक्त उपक्रम असलेल्या रिफायनरीला बांबू पुरवठा करतील. मंत्री तेली म्हणाले की, या विस्तारित प्रकल्पामुळे त्याची क्षमता ३ एमएमटीपीए वरून वाढून ९ एमएमटीपीएपर्यंत पोहोचेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here