लखनौ : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेतकर्यांच्या ऊसाच्या थकबाकीसाठी प्राधान्य देण्यात आले असून ऊसमंत्री सुरेश राणा यांच्या प्रयत्नामुळे प्रदेशातील 20 सहकारी साखर कारखान्यांवर गाळप हंगाम 2018-19 च्या थकबाकीसाठी 200,00 करोड रुपये मंजुर केले आहेत. या निधी पासून सहकारी क्षेत्रातील साखर कारखान्यांद्वारा गाळप हंगाम 2018-19 चे उर्वरीत ऊस थकबाकी शेतकर्यांना भागवली जाईल. शेतकर्यांना ऊसाची किंमत भागवणे ही राज्य सरकारची प्रथामिकता आहे.
प्रदेशाचे साखर आयुक्त संजय भूसरेड्डी म्हणाले, सहकारी क्षेत्रातील 24 साखर कारखान्यांमधून 04 सहकारी साखर कारखाने मोरना, पुवाया, स्नेहरोड व साठियांव यांच्याकडून पूर्वीच गाळप हंगाम 2018-19 ची थकबाकी भागवण्यात आली आहे. उर्वरीत 20 सहकारी साखर कारखान्यांवर असणारी शेतकर्यांची थकबाकी भागवण्यासाठी सरकारकडून 200.00 करोडचा निधी दिला गेला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ऊस शेतकर्यांच्यात आनंद पसरला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.