मुंबई : मंगळवारी केंद्र सरकारने इंधनासाठी लागणाऱ्या इथेनॉल चा भाव वाढविण्याचे निश्चित केल्यानंतर महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांकडून इथेनॉल उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी पुढील दोन वर्षांत २५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यावर लक्ष आहे.
महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची दरवर्षी ५७ कोटी लिटर इथेनॉल उत्पादनाची क्षमता आहे आणि सुमारे २५०० कोटी रुपयांच्या गुंतवणूकीने पुढील दोन वर्षांत ही क्षमता दुप्पट होऊ शकते, असे महाराष्ट्र राज्य साखर सहकारी महासंघाच्या अधिकाऱ्याने सांगितले. प्रमुख राजकारण्यांनी नियंत्रित केलेली साखर कारखानदारी, नव्या उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक व केंद्रीय निधी संस्थांकडून निधी मिळविण्याची शक्यता आहे.
गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्राच्या साखर कारखानदारांनी तेल विपणन कंपन्यांनी दिलेले मूल्य पुरेसे फायदेशीर नाही या कारणास्तव १४ कोटी लिटरपेक्षा कमी इथेनॉल तयार केले होते.
इथेनॉल प्रतिलिटर ५९ .१३ रुपये देण्याच्या केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर मात्र उत्पादन वेगाने वाढण्याची अपेक्षा आहे. तेल विपणन कंपन्यांना साखरेला “ खरे ” वाहतूक शुल्क देण्यास सांगितले आहे.
आतापर्यंत कच्च्या साखरेपासून इथेनॉल तयार होण्यास परवानगी नव्हती. परंतु कच्च्या साखरे पासून बनविल्या जाणाऱ्या इथेनॉलच्या जास्त किंमतींमुळे साखर कारखानदारांच्या अतिरिक्त साखरेच्या साठ्यात मोठी घट होण्याची अपेक्षा आहे,
असे शेखर संघवी यांनी सांगितले.
साखरेपासून इथेनॉल तयार करण्यासाठी प्रक्रियेआधी ते प्रथम पाण्यात विरघळवून सिरपमध्ये रूपांतरित करावे लागते.
मागील वर्षापर्यंत इथेनॉल केवळ मळीमधून तयार करण्याची परवानगी होती. २o२२ पर्यंत १० टक्के आणि २०३० पर्यंत २० टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्याचे, केंद्र सरकारच्या जैव-इंधन धोरणाचे उद्दीष्ट आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.