पांडुरंग कारखान्याकडून प्रति टन २,८०० रुपये पहिली उचल : चेअरमन प्रशांत परिचारक

सोलापूर : श्रीपूर (ता. माळशिरस) येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडे यंदाच्या गळीत हंगामात उसाला २८०० रुपये पहिली उचल देण्यात येणार आहे. काखान्याचे चेअरमन, माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी वाखरी (ता. पंढरपूर) येथे आयोजित कार्यक्रमात ही घोषणा केली. पांडुरंग कारखाना हा जिल्ह्यात सर्वाधिक पहिली उचल देणारा पहिला साखर कारखाना ठरला आहे.

चेअरमन परिचारक म्हणाले की, हंगामाच्या सुरुवातीला १५ जानेवारीपर्यंत गाळपास येणाऱ्या उसाचा पहिला हप्ता २८०० प्रती टन असेल. तर १६ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२४ पर्यंत उशिराने गाळपास येणाऱ्या उसाला जादा ५० रुपये प्रती मेट्रिक टन देवून २,८५० रुपये पहिला हप्ता देण्यात येणार आहे. १ ते २८ फेब्रुवारीपर्यंत उशिराने गाळप होणाऱ्या उसाला १०० रुपये प्रती मे. टन जादा दिले जातील. त्यांना २९०० रुपये पहिला हप्ता देण्यात येणार आहे. १ मार्चनंतर येणाऱ्या उसाला १५० रुपये ज्यादा म्हणजे २९५० रुपये असा पहिला हप्ता मिळेल.

दरम्यान, कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी म्हणाले की, कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक तसेच कारखाना व्यवस्थापनाने कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच चांगला दर दिला आहे. शेतकरी हिताय कामगार काय ही कै. सुधाकरपंत परिचारक मोठे मालक यांची शिकवण जोपासलेली आहे. यापूर्वी कारखान्याने अनेक वर्षे सर्वोच्च दर देण्याची तीच परंपरा अखंडित ठेवली गेली आहे. यावेळी व्हा. चेअरमन कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, संचालक दिनकरराव मोरे, वसंतराव देशमुख, उमेश परिचारक, दिलीप चव्हाण, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासो यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here