पाटणा : बिहार आता उद्योगाच्या बाबतीत प्रगतीपथावर आहे. गेल्या एक वर्षात बिहारला ३९,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव मिळाले आहेत. यापैकी ३०,३८२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव इथेनॉल उत्पादनाशी संलग्न आहेत. उद्योग मंत्री शाहनवाज हुसेन यांनी आपला एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सांगितले की, गेल्या वर्षभरात ३८,९०६ कोटी रुपयंची ६१४ गुंतवणूक प्रस्ताव आले आहेत. हे प्रस्ताव अन्न प्रक्रिया, आरोग्य, कृषी, प्लास्टिक आणि रबर तसेच पर्यटन उद्योगाशी संबंधीत आहेत. आतापर्यंत राज्यात ८७ युनिट स्थापन करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएस सरकारच्या चौथ्या कार्यकाळात एकूण १७ इथेनॉल उत्पादन युनिटच्या प्रस्तावांवर कार्यवाही झाली आहे. यामध्येचार लवकरच भोजपूरमध्ये १८० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने उत्पादन सुरू करतील. अशाच पद्धतीने गोपालगंजमध्ये १३३,२५ कोटी रुपये आणि ४० कोटी रुपयांची दोन युनिट्स सुरू होणार आहेत. पुर्णियामध्येही ९६.७६ कोटी रुपये गुंतवणूकीने एक युनिट सुरू होईल.
हुसेन म्हणाले की देशातील उद्योगपतींनी चांगल्या पायाभूत सुविधा, चांगली कायदा-सुव्यवस्थेमुळे राज्यात गुंतवणुकीसाठी उत्सुकता दर्शवली आहे. बिहार लवकरच औद्योगिक केंद्र म्हणून विकसित होईल. आणि रोजगार संधी देईल. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बेगुसरायमधील बरौनी येथे ५५७ कोटी रुपये खर्चून पेप्सीचा बॉटलिंग प्लँट उत्पादनासाठी तयार आहे. मुजफ्फरनगरातील मोतीपूरमध्ये १८७ कोटी रुपयांची गुंतवणूक करून मेगा फूड पार्क खुला होणार आहे.