सांगली : कारखानदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. टनाला ३ हजार ते ३२०० दर न परवडणारा आहे. जो कारखाना टनाला ४ हजार हजार रुपये दर देईल. त्या कारखानदारांना ५ तोळे सोने, एक चारचाकी, रोख १ लाख व हत्तीवरून मिरवणूक काढू असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दिलीप पवार, भागवत जाधव यांनी दिले. ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांचे हे आव्हान कारखानदारांनी स्वीकारावे असे आवाहन करण्यात आले. उसाला प्रतिटन ४ हजार दर देता येतो. कोणत्याही कारखानदारांने हे खोटं आहे हे सिद्ध केल्यास पाच तोळे सोने, एक लाख रुपये, एक कार व त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात येईल, असे खुले कार्यकर्त्यांनी दिले आहे.
गळीत हंगाम जवळ आला आहे. त्यामुळे ऊसदराचा प्रश्न पुन्हा डोके वर काढणार आहे. खरेतर अलीकडील १०-१५ वर्षांत बियाणे मजुरी पाणीपट्टी, रासायनिक खतांचे दर वारेमाप वाढले. त्यामुळे ऊस उत्पादनाचा खर्च वाढला आहे. ऊस दर म्हणावा तसा वाढला नाही. एकरी ऊस उत्पादनाचा लागणीपासून तोडणीपर्यंतचा खर्च एकरी ८० हजार ते लाखापर्यंत गेला आहे. कारखाने ३००० ते ३२०० दर देत आहेतय हा दर उत्पादकांना न परवडणारा आहे. साखरेचा खुल्या बाजारातील दर, उपपदार्थ निमिर्तीमधून होणारा फायदा हे लक्षात घेता प्रती टन ४००० रुपये ऊस दर देणे शक्य असल्याचे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.