सोलापूर (महाराष्ट्र) : गेल्या दहा वर्षात आमचे सरकार शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, इथेनॉलच्या अर्थव्यवस्थेला चालना दिल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 80 हजार कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, एनडीए सरकार देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे. इथेनॉलच्या माध्यमातून आम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कमाईचे नवीन मार्ग तयार करत आहोत. ते म्हणाले कि, सध्या पेट्रोलमध्ये 15 टक्के इथेनॉल मिसळले जात असून गेल्या 10 वर्षांत इथेनॉलचे उत्पादन 20 टक्के वाढवण्याचे आमचे लक्ष्य आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे आणि मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. विरोधी MVA आघाडीमध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT) आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा (SCP)चा समावेश आहे. तर सत्ताधारी महाआघाडीत भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचा समावेश आहे.
इथेनॉल इंडस्ट्रीच्या अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.