मेरठ : बिले न मिळाल्याने जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून सहा साखर कारखाने सुरू आहेत. कारखान्यांनी चालू गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये ५७६.८७ कोटी रुपयांची ऊस बिले दिली आहेत. मात्र, दहा मार्चअखेर ९८६.८४ कोटी रुपये थकीत आहेत.
जिल्ह्यात शेतकऱ्यांना उसाचे पैसे देण्यामध्ये दौराला साखर कारखाना प्रथम क्रमांकावर आहे. तर किनौनी कारखान्याची स्थिती चिंताजनक आहे. दौराला कारखान्याने आतापर्यंत शेतकऱ्यांना ७८ टक्के पैसे दिले आहेत. तर किनौनी कारखान्याने फक्त २ टक्के पैसे दिले आहेत. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी फक्त ३६.८९ टक्के पैसे शेतकऱ्यांना दिले आहेत.
मेरठ जिल्ह्यात सहा साखर कारखान्यांची गाळप क्षमता ४८८०० टन प्रतिदिन आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सर्व कारखान्यांनी २०२०-२१ या हंगामातील गाळप सुरू केले. जिल्ह्यांतील सहा कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून दहा मार्चपर्यंत ५४८.४६ लाख क्विंटल ऊस खरेदी केली. एकूण ५४८ लाख क्विंटल गाळपासह ५६.७९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले. साखरेचा सरासरी उतारा १०.३६ टक्के आहे.