रुपयाची दररोज घसरण सुरुच, ८२ च्या कमकुवत स्तराकडे वाटचाल?

नवी दिल्ली : अमेरिकेत सातत्याने व्याज दर वाढत आहेत. या आठवड्यात अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने सलग तिसऱ्यांदा व्याज दरात ०.७५ टक्के वाढ केली. ही दरवाढ थांबणार नसल्याचे संकेत मिळाले असल्याने जगभरातील चलनांमध्ये घसरण सुरू आहे. फेडरल रिझर्व्हने दर आणखी वाढवण्याचे संकेत दिल्याने जगभरातील गुंतवणूकदार पैसे काढून घेत आहेत. आणि अमेरिकेत आपली गुंतवणूक वाढवू लागले आहेत. त्याच कारणामुळे भारतीय रुपयाची स्थिती बिकट झाली आहे. रुपया दररोज निच्चांकी स्तराकडे जावू लागला आहे. शुक्रवारी भारतीय शेअर बाजारातील ट्रेडिंग सेशनमध्ये रुपया पहिल्यांदा ८१ च्या स्तरावर पोहोचला.

आजतकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, रुपयाने जुलै महिन्यात ८० च्या स्तराला स्पर्श केला होता. मात्र नंतर त्यामध्ये रिकव्हरी झाली. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पहिल्यांदाच रुपया ८० च्या स्तराखाली बंद झाला. आता शुक्रवारी रुपयाने ८१ चा टप्पा पार केला. सुरुवातीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रुपया डॉलरच्या तुलनेत ३९ पैशांनी घसरून ८१.१८ वर आला. गुरुवारी रुपयाने निच्चांकी स्थितीत गेला होता. अर्थतज्ज्ञांच्या मते रुपया लवकरच डॉलरच्या तुलनेत ८२ च्या स्तरावर पोहोचेल. यावर्षी आतापर्यंत रुपया ७ टक्के कमकुवत झाला आहे. जवळपास दोन दशकानंतर डॉलरच्या तुलनेत युरोचे मूल्यही कमी झाले आहे. डिसेंबर २०१४ पासून आतापर्यंत भारतीय रुपया २५ टक्के कमकुवत झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here