मुंबई : डॉलरच्या तुलनेत सोमवारी रुपया आपल्या निच्चांकी स्तरावर पोहोचला आहे. हा डॉलरच्या तुलनेत रुपयाचा आतापर्यंत सर्वात निच्चांकी स्तर आहे. यूएस फेडरलच्या प्रमुखांनी दिलेल्या संकेतामुळे ही घसरण दिसून आली आहे. यूएस फेडरलचे मुख्य जेरोम पॉवेल यांनी शुक्रवारी केंद्रीय बँकेसोबत झालेल्या बैठकीनंतर महागाई नियंत्रणासाठी व्याज दरात सूट देणे आताच शक्य नसल्याचे संकेत दिले होते. या इशाऱ्यानंतर रुपया आणखी कमजोर झाला. एक डॉलरची किंमत ८०.११ रुपये झाली आहे. रुपयाची आधीची क्लोजिंग किमत ७९.९७ रुपये होती.
लाइव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गेल्या महिन्यातच रुपयाने डॉलरच्या तुलनेत आपले सर्व जुने विक्रम मोडीत काढले आहेत. तेव्हा एक डॉलरची किंमत ८०.०६ रुपये होती. आजच्या घसरणीने गेल्या महिन्यातील हा विक्रमही मोडीत काढला आहे. भारतीय शेअर बाजारातही सोमवारी सकाळच्या ट्रेडिंग सेशनमध्ये खराब स्थिती होती. सेन्सेक्स १४६६ अंकांनी घसरुन सुरुवात झाली आहे. जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे व्ही. के. विजयकुमार यांच्या म्हणण्यानुसार, यूएस फेडरलच्या प्रमुखांकडून मार्केटला सकारात्मक संकेत अपेक्षित होते. मात्र, त्यांचा इशारा लोकांसाठी आणि बिझनेससाठी चांगला नाही. महागाई रोखण्यासाठी अशा कठोर उपायांची अपेक्षा कमी आहे.