रशियाचा युक्रेनवर हल्ला, राजधानी कीवसह अनेक शहरात स्फोट

मॉस्को : युक्रेनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाने हल्ला चढवला आहे. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी सैन्यदलाने कारवाई केल्याची औपचारिक घोषणा केली आहे. यासोबत रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी रशियाच्या या ऑपरेशनमध्ये हस्तक्षेप करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने पुतीन यांना युद्ध थांबविण्याची विनंती केली आहे. रशियाने आपल्या सैन्याला हल्ला करण्यापासून रोखावे असे यूएनने म्हटले आहे.

एएफपी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रशियाने युद्ध सुरू झाल्याची घोषणा केल्यानंतर युक्रेनची राजधानी कीव येथे स्फोट झाल्याचे ऐकायला मिळाले. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी सांगितले की, युक्रेनने मर्यादा ओलांडली आहे. दरम्यान, युक्रेनच्या राष्ट्रपतींनी देशात मार्शल लॉ जारी केला आहे. नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन त्यांनी केले आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने युक्रेनच्या वायुसेनेला निष्क्रीय केल्याचा दावा केला आहे. तर युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी म्हटले आहे की, रशियाला हल्ला करण्यापासून जगाने रोखले पाहिजे. युक्रेन आपला बचाव करीत राहील आणि हे युद्ध जिंकेल. रशियाने युद्धाची औपचारिक घोषणा केली आहे. अमेरिकेने राष्ट्रपती बायडेन यांनी म्हटले आहे की, रशियाच्या सैन्य दलांनी युक्रेनच्या नागरिकांवर केलेला हल्ला अनुचित आहे. तर ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी आम्ही याचे निर्णयाक उत्तर देऊ असे म्हटले आहे. तर भारताने शांततेचे अपिल केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here