रशिया बनतोय भारताचा टॉप इंधन सप्लायर, सौदी अरेबिया, इराकला टाकले मागे

क्रुड ऑईलच्या वाढत्या किमतींचा महागाईवर परिणाम कमी व्हावा यासाठी भारत सरकारने पाश्चात्य देशांच्या दबावावर लक्ष दिलेले नाही. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात रशिया हाच भारताचा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार बनला आहे. महागड्या क्रूडच्या खेळात देशाचे पारंपरिक पुरवठादार रशियाने मागे टाकले आहेत. रशिया भारताला सवलतीच्या दरात कच्चे तेल देत आहे. त्यामुळे भारताने रशियाकडून पुरवठा वाढवल्या आहे. एका रिपोर्टनुसार, ऑक्टोबर महिन्यात कच्च्या तेलाची खरेदी ५ टक्के वाढली आहे. आणि रशियाकडून तेल खरेदीत ८ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.

टीव्ही९हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार ऑक्टोबर महिन्यात रशियाकडून भारताने प्रती दिन ९.४६ लाख बॅरल कच्चे तेल खरेदी केले असल्याचे इकॉनॉमिक टाइम्सने म्हटले आहे. हा एका महिन्यातील सर्वाधिक स्तर आहे. देशाच्या एकूण इंधन खरेदी हिस्सेदारी पाहिली असता भारताने आपल्या एकूण खरेदीच्या २२ टक्के हिस्सा रशियाकडून घेतला आहे. इराकचा हिस्सा २०.५ टक्के तर सौदी अरेबीयाचा हिस्सा १६ टक्क्यांचा आहे. भारताने रशियाकडून केलेली इंधन खरेदी युरोपियन युनियनकडून केलेल्या खरेदीपेक्षा ३४ टक्के अधिक आहे. सध्या १० लाख बॅरल तेल प्रती दिन खरेदी करून चीन रशियाचा सर्वात मोठा ग्राहक आहे. तर ऑक्टोबर महि्यात भारताने रशियाकडून इंधन खरेदीचा नवा उच्चांक गाठला आहे. एका दिवसात भारताने १०.६ लाख बॅरल तेल आयात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here