नवी दिल्ली : अमेरिका व युरोपने रशियातील कच्च्या तेलाच्या आयातीवर निर्बंध लागू केल्यानंतर कच्च्या बाजारातील तेलाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात ३०० डॉलर प्रती बॅरलवर पोहोचू शकतात रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर रशियाचे उप मुख्य मंत्री अलेक्झांडर नोवाक यांनी रशियावर निर्बंध लादल्यास विनाशकारी परिणाम होतील असा इशारा दिला आहे. कच्च्या तेलाच्या दरात बेहिशोब वाढ होईल. तर हे केल ३०० अब्ज डॉलरही होऊ शकते. अलेक्झांडर नोवाक म्हणाले, युरोपच्या बाजारपेठेतून रशियाचे तेल बदलणे हे अशक्य आहे. यासाठी एक वर्षाचा कालावधी लागेल. युरोपिय जनतेसाठी हे महागडे ठरणार आहे. नोवाक म्हणाले की, युरोपातील राजकीय नेत्यांनी आपल्या नागरिकांना काय घडू शकते याची जाणीव करुन दिली पाहिजे. गॅस स्टेशनवरील विजेचे दर गगनाला भिडू शकतात.
नोवाक म्हणाले, रशियाच्या तेलावरील निर्बंधांमुळे अस्थिरता निर्माण होईल. ग्राहकांचे सर्वाधिक नुकसान होऊ शकते. नॉर्ड स्ट्रीम २ पाइपलाइन योजना रोखण्यावरील प्रत्त्युत्तरात रशिया नॉर्ड स्ट्रीम १ पाइपलाइनमधूनपुरवठा रोखू शकतो. आम्ही अद्याप हा निर्णय घेतलेला नाही. या निर्णयाचा कोणाला फायदा होणार नाही. मात्र, युरोपातील राजकीय नेते रशियाविरोधात घोषणा देऊन आम्हाला याकडे ओढत आहेत. रशिया-युक्रेनमधील युद्ध थाबले नाही तर कच्च्या तेलाचे दर वाढू शकतात. भारतासमोरील अडचणी वाढणार आहेत. भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करतो. हा पुरवठा रोखला जाणार आहे.