मास्को : देशामध्ये १५ मे ते ३१ ऑगस्ट या कालावधीत ३,५०,००० टन पांढरी साखर आयात करण्यासाठी रशियातील सरकार आयात कर हटविणार आहे. सरकारने याची घोषणा केली आहे. जगातील सर्वात मोठा गहू निर्यातदार देश असलेल्या रशियाने डिसेंबरमध्ये अनेक धान्यांच्या निर्यातीवर कर आणि अन्य उपाय लागू केले आहेत.
देशांतर्गत महागाईचा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी कर लागू करण्याचे उपाय राबविण्यात आले. या उपायांतर्गत रशियामध्ये साखर आणि खाद्यतेल उत्पादकांनी मार्चच्या अखेरपर्यंत किरकोळ श्रेणीतील आपल्या उत्पादनांचे दर कमी करण्यास सहमती दर्शविली आहे.
सोमवारी सरकारने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, उत्पदकांसोबत झालेल्या या समझोत्याबाबत लवकरच विस्तृत चर्चा केली जाईल. साखरेसाठी जून अखेरपर्यंत आणि सूर्यफूल तेलासाठी ऑक्टोबरपर्यंत ही आयात कर कपातीची योजना वाढविली जाऊ शकते.