बश्किरिया : कृषी मंत्रालयाने बिटची लागवड आणि साखर उत्पादन वाढविण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला आहे. रावेका आणि चिश्ची या दोन साखर कारखान्यांच्या परिसरात बिटची लागवड केली जाते.
आधुनिकीकणानंतर दररोज ६ हजार टन कच्च्या मालाचे गाळप येथे केले जाऊ शकते. या हंगामात क्रशिंग क्षमता प्रती दिन ५ हजार टनापर्यंत पोहोचणार आहे. अलिकडेच चार साखर कारखान्यांनी प्रती दिन एकूण ९ हजार टन मूळ वर्गीय पिकांचे क्रशिंग केले होते.
चिश्मिंक्सी साखर कारखान्याच्या आधुनिकीकरणासाठी १ बिलियनहून अधिक रुबल गुंतवणूक करण्यात आली आहे. याशिवाय आणखी १.७ बिलियन रुबल गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव आहे. रावेका कारखान्यात यावर्षी ४७० मिलियन रुबलची गुंतवणूक आणि २०२२ पर्यंत ४५७ मिलियन रुबल गुंतवणूकीसह दोन वर्षांची आधुनिकीकरण योजना लागू करण्यात येणार आहे. कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, चालू हंगामात साखर बिटची लागवड ३५ हजार हेक्टर होईल. यापूर्वी २०२० च्या हंगामात २६ हजार हेक्टरवर बिट लागवड करण्यात आली होती. आगामी २०२२ च्या हंगामात या लागवड क्षेत्रात आणखी वाढ करण्याचा प्रस्ताव आहे.