ट्रेड डील: भारताच्या कार व खाद्यपदार्थांवर रशियाची नजर, डॉलरऐवजी रुपयात व्यापार शक्य

युक्रेन आणि रशियादरम्यान युद्धामुळे साहित्य पुरवठ्यात कपात झाली आहे. अशा स्थितीत रशिया भारताकडून काही वस्तूंची मागणी करीत आहे. रशियाने भारताकडे कार व इतर ऑटोमोबाईल साहित्य, खाद्यपदार्थांसाठी अॅग्रीकल्चर प्रॉडक्ट मागितले आहेत. तर निर्यातदारांनी भारतीय चलनात व्यापार करण्याची आणि खर्च कमी करण्याची मागणी केली आहे.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, रशियाने भारताकडे कार, धान्य अशा वस्तूंची मागणी केली आहे. युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियावर चोहीकडून बंदी घातली गेली आहे. त्यामुळे वस्तूंची टंचाई आहे. वाहनांचे पार्ट्सही कमी आहेत. त्यामुळे अनेक कार कंपन्या आपल्या फर्म बंद करीत आहेत. टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध वृत्तानुसार, भारतीय ऑटो कंपोनंट भागधारकांसह कार कंपन्यांनीह रशियात प्रवेश करावा, तर ऑटो पार्टची निर्यात शक्य आहे.

भारतीय ऑटोमोबाईल उद्योगातील अनेक कंपन्या वाहनच्या पुरवठ्यासाठी सहमत होवू शकतात. टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रासारख्या देशांतर्गत कंपनांही आंतरराष्ट्रीय स्तरावर जावू शकतात. त्यांचे मार्की जग्वार, लँड रोव्हर आदी ब्रँड आधीच आहेत. रशियाच्या निर्यातदारांना सोयाबीन व इतर अॅग्रीकल्चर प्रॉडक्ट्सची गरज आहे. सुपरमार्केटमधील कपाटे सध्या रिक्त असल्याचे एका निर्यातदारांनी सांगितले. तसेच निर्यातदारांनी रुपया आणि रुबलमध्ये व्यवसाय करण्याची मागणी केली आहे. सध्याच्या व्यवहारात जवळपास ४ टक्के नुकसान होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here