एस. आलम साखर कारखान्यास 5 लाखाचा दंड

चितगाव येथील एस आलम शुगर इंडस्ट्रिज लिमिटेडने कारखान्यातील सांडपाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया न करता कर्नाफुली नदीमध्ये सोडले. यासंदर्भात एस. आलम कारखान्यावर पर्यवरण विभागाने कारवाई करत 5 लाखाचा दंड ठोठावला आहे. इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट (ईटीपी) शिवाय कारखाना कार्यरत असल्याची माहिती डीओई चे संचालक मोझझम हुसेन यांनी दिली.

चितगाव येथील विभागीय प्रयोगशाळेच्या पथकाने 11 सप्टेंबर रोजी कारखान्याची तपासणी केली होती. यामध्ये डीओईच्या पथकास कारखान्याचे ईटीपी निष्क्रिय असल्याचे दिसून आले.
कारखान्यातील सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता तो द्र

वकचरा कर्णफुली नदीत सोडल्याचे लक्षात आल्यानंतर पथकाने कर्णफुली येथून नमुने गोळा केले. प्रयोगशाळेत केलेल्या चाचण्यांवरुन असे दिसून आले की, हे नमुने पर्यावरण संवर्धन नियमांनी ठरवलेल्या निकषांच्या पलीकडचे आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here