धाराशिव : एस. पी. शुगर प्रायव्हेट लिमिटेड कारखान्याच्यावतीने परिसरातील इतर कारखान्यापेक्षा यावर्षी अधिक दर देण्याची ग्वाही यावेळी एस. पी उद्योग समुहाचे चेअरमन सुरेश पाटील यांनी दिली. कारखान्याच्या सातव्या गळीत हंगामाचा शुभारंभ कार्यकारी संचालक समीर पाटील यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस कारखान्याला पाठवून सहकार्य करावे असे आवाहन यावेळी कारखाना प्रशसानाच्यावतीने करण्यात आले. यावेळी चेअरमन सुरेश पाटील, शहाजी वाघ, किरण आवटे, सुधीर करंजकर, धनंजय धाबेकर, सुदर्शन करंजकर, गणेश करंजकर, शेतकी अधिकारी गंगाधर गुंड, चीफ केमिस्ट चंद्रसेन मारडकर, चीफ इंजिनियर प्रताप चौरे आदी मान्यवर उपस्थित होते.