बुलंदशहर : शासनाने जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने सुरू करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार, सात नोव्हेंबरला साबितगड आणि अनामिका साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू होईल. अनुपशहर आणि वेव्ह साखर कारखाना १० नोव्हेंबरपर्यंत सुरू होणार आहे. जिल्ह्यातील सर्व कारखान्यांची गाळप हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
जिल्ह्यात यंदा ७४ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस पिक आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या १.२८ लाखाहून अधिक झाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून ८ साखर कारखाने ऊस खरेदी करतात. यापैकी हापूडमध्ये ब्रजनाथपूर आणि सिंभावली, अमरोहातील चंदनपूर आणि संभलमधील रजपूरा अशा चार कारखान्यांचा समावेश आहे. दुसरीकडे शासनाने जिल्ह्यातील सर्व कारखान्यांना ऊस गाळपाचे उद्दीष्ट आणि ऊस खरेदीसाठीची केंद्रेही निश्चित करून दिली आहेत. जिल्ह्यातील कारखाने यंदा ४१८ लाख क्विटंलहून अधिक ऊस खरेदी करतील. जिल्ह्यात २४६ ऊस खरेदी केंद्रे आहेत. वजन केंद्रही सुरू झाली आहेत. कारखान्यांचे गाळप यापूर्वीच सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र, यात पावसाने अडथळे आले. याबाबत जिल्हा ऊस अधिकारी डी. के. सैनी यांनी सांगितले की, सर्व साखर कारखान्यांची तयारी पूर्ण झाली आहे. तोडणी पावत्यांचे वेळापत्रक ऑनलाईन जाहीर करण्यात आले आहे.