रुडकी : ऊस विकास परिषदेच्या अध्यक्षांनी मंडळाची तातडीची बैठक बोलावून भ्रष्टाचाराचा आरोप झालेल्या वरिष्ठ ऊस विकास निरीक्षकांना तातडीने कार्यमुक्त केले. या बाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी करून निरीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी अध्यक्ष चौधरी यांनी केली आहे.
ऊस विकास परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र सिंह चौधरी यांनी शुक्रवारी मंडळाची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत त्यांनी वरिष्ठ ऊस विकास निरीक्षक दिग्विजय सिंह हे सरकारी मालमत्तेचा गैरवापर करीत असल्याचा आरोप केला. समितीच्या सदस्यांनीही ज्येष्ठ ऊस विकास निरीक्षक हे संचालकांचा सन्मान राखत नाहीत. अध्यक्षांना विश्वासात न घेता धनादेश वटवले जातात. त्यामध्ये कमिशन घेतले जाते असा आरोप करण्यात आला. त्यामुळे लक्सर ऊस विकास परिषदेतून त्यांना कार्यमुक्त करण्यात आले.
यावेळी ऊस विकास समितीचे चेअरमन जितेंद्र सिंह नागर, अतुल गुप्ता, अनूप सिंह, सोनू चौधरी, गुड्डू चौधरी, देवव्रत, सादिक खान, उदयवीर सिंह, वचन सिंह, विक्रम, अफजाल, विशाल, सुमित आदी उपस्थित होते. दरम्यान, या प्रकरणाची माहिती वरिष्ठांना दिली आहे असे हरिद्वारचे सहाय्यक ऊस आयुक्त शैलेंद्र सिंह नेगी म्हणाले. तर द्विग्वीजय सिंह यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले.