कोल्हापूर : हमीदवाडा येथील सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्यास इथेनॉल उत्पादन करण्यास परवानगी मिळाली आहे. कारखान्याचे अध्यक्ष संजय मंडलिक यांनी ही माहिती दिली. पेट्रोलियम तथा विस्फोटक सुरक्षा संघटन (पेसो) मुंबई यांच्याकडून डिस्टीलरी प्रकल्पातून ही परवानगी देण्यात आली. कारखान्याचा डिस्टीलरी प्रकल्प सन २०२१-२२ मध्ये सुरू झाला आहे. प्रकल्पामधून रेक्टीफाईड स्पिरीट व एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोलचे (इएनए) उत्पादन घेतले जात होते. आता कारखान्याला इथेनॉल उत्पादनासाठी ‘पेसो’ने ८ नोव्हेंबर रोजी मंजुरी पत्र दिले आहे.
मध्यंतरी केंद्र शासनाच्या धोरणामुळे बी हेवी व सिरपपासून स्पिरीट उत्पादनास बंदी घातली. स्पिरीट व इएनएचे अतिरिक्त उत्पादन झाल्याने त्याला अपेक्षित दर मिळाला नाही. त्यामुळे अडचणी आल्या. त्यानंतर कारखान्याने इथेनॉल उत्पादनावर भर दिला होता. आता येत्या हंगामापासून इथेनॉल उत्पादनास सुरुवात केले जाईल. कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजीराव इंगळे, संचालक वीरेंद्र मंडलिक, सत्यजित पाटील, विश्वासराव कुराडे, आनंदराव फराकटे, कैलाससिंह जाधव, महेश घाटगे, भगवानराव पाटील, प्रदीप चव्हाण, कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील, डिस्टीलरी विभागप्रमुख विजय पाटील, प्रकाश कुंभार उपस्थित होते.