कोल्हापूर : लोकनेते सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याने मागच्या वर्षी केवळ ११८ दिवस कारखाना चालला. आता गाळप क्षमतेचा विस्तार केल्याने दररोज पाच हजार टनाने गाळप होईल. वाढीव गाळप क्षमता व उपलब्ध ऊस पाहता येत्या गळीत हंगामात ६ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष व माजी खासदार संजय मंडलिक यांनी केले. कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन प्रसंगी ते बोलत होते.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्याला पाठवून द्यावा असे आवाहन यावेळी अध्यक्ष मंडलिक यांनी केले. कार्यक्रमाला माजी आमदार सुरेश हाळवणकर व हिंदुराव शेळके हे प्रमुख उपस्थित होते. यावेळी संचालक सत्यजित पाटील व डॉ. शिल्पा पाटील या उभयतांच्या हस्ते विधिवत पूजा झाली. वीरेंद्र मंडलिक यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष शिवाजीराव इंगळे, आर. डी. पाटील, शिवानी भोसले, अतुल जोशी, नामदेवराव मेंडके, डॉ. शिवाजी होडगे, प्राचार्य टी. एम. पाटील, तानाजी सातपुते, वर्षा पाटील उपस्थित होते.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.