सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्यास देशातील “प्रथम क्रमांकाचा सर्वोच्च साखर उतारा” पुरस्कार प्रदान
हमिदवाडा (ता. कागल ) येथील सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन को-ऑपरेटीव्ह, नवी दिल्ली यांचेकडून गळीत हंगाम २०१८-१९ साठीचा देशातील “प्रथम क्रमांकाचा सर्वोच्च साखर उतारा” पुरस्कार देऊन सन्मानित करणेत आले.
या पुरस्कार सोहळ्यास अध्यक्ष विजयपाल शर्मा, नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, उपाध्यक्ष केतन पटेल, हर्षवर्धन पाटील, खासदार संजय मंडलिक, जयप्रकाश दांडेगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. कारखान्याचे चेअरमन, खासदार संजय मंडलिक, व्हाईस चेअरमन बंडोपंत चौगुले यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी संचालक मंडळ व पदाधिकारी उपस्थित होते.
यापूर्वी कारखान्याने २००७-०८ या हंगामामध्ये उच्चांकी असा १३.६८ टक्के इतका उच्चांकी उतारा प्राप्त केला होता. त्यासाठी नॅशनल फेडरेशन को-ऑपरेटीव्ह, नवी दिल्ली यांचेकडून देशातील आजपर्यंतचा “सर्वोच्च साखर उतारा” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन खासदार संजय मंडलिक यांनी ,स्वर्गीय लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांनी घालून दिलेल्या आदर्शामुळेच हे यश प्राप्त झाले असून कारखान्यास ऊस पुरवठा करणा-या सभासद, शेतकरी, तोडणी वाहतूक कंत्राटदार, संचालक मंडळातील सदस्य,अधिकारी, कामगार व कर्मचारी यांचा यामध्ये मोलाचा वाटा आसल्याच्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी कारखान्याचे संचालक शिवाजीराव इंगळे, शहाजी यादव, प्रकाशराव पाटील, Adv. विरेंद्र मंडलिक, शंकर व्यंकू पाटील, मसू पाटील, कैलाससिंह जाधव, चित्रगुप्त प्रभावळकर, आप्पासो तांबेकर, दत्तात्रय चौगुले, प्रदिप चव्हाण, कामगार प्रतिनिधी सर्जेराव पाटील, तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील, चिफ इंजिनिअर एस .पी. पाटील, चिफ केमिष्ट विक्रम पाटील, असि. सेक्रेटरी रावसाहेब बोंगार्डे, अकौंटंट एस. टी. पाटील, असि. पी. आर. ओ. सतिश पाटील इत्यादी उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.