सहकार महर्षी कारखान्याचे १० लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट : स्वरुपाराणी मोहिते-पाटील

सोलापूर : सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२४-२०२५ मध्ये १० लाख मे.टन. ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व सभासद व बिगर सभासद यांनी आपला ऊस कारखान्यास गळीतास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याच्या संचालक स्वरुपाराणी जयसिंग मोहिते-पाटील यांनी केले. कारखान्यामध्ये गळीत हंगामासाठी मिल रोलरचे पूजन संचालक स्वरुपाराणी मोहिते-पाटील यांचे हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले म्हणाले की, मार्गदर्शक संचालक व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे कुशल मार्गदर्शनाखाली आणि चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. गळीत हंगामासाठी कारखाना व इतर उपपदार्थ प्रकल्पाकडील ओव्हर हॉलिंगची कामे प्रगतीपथावर आहेत. शेती विभागामार्फत ऊस तोडणी वाहतुकीचे वाहन करार सुरू आहेत. यावेळी व्हाईस चेअरमन शंकरराव माने – देशमुख, संचालक लक्ष्मण शिंदे, सतीश शेंडगे, नानासाहेब मुंडफणे, विजयकुमार पवार, विराज निंबाळकर, महादेव क्षीरसागर, अमरदिप काळकुटे, गोविंद पवार, जयदिप एकतपुरे, रामचंद्र ठवरे, सुजाता शिंदे, रामचंद्रराव सावंत – पाटील, रणजित रणनवरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here