सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याचा उद्या बॉयलर अग्नी प्रदीपन : उपाध्यक्ष संतोष हासे

अहिल्यानगर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ उद्या (गुरुवारी) आमदार बाळासाहेब थोरात व कांचनताई थोरात यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती उपाध्यक्ष संतोष हासे यांनी दिली. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ओहोळ राहणार आहे. आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, अॅड. माधवराव कानवडे आदी उपस्थित राहणार आहेत.

थोरात साखर कारखान्याने मागील गळीत हंगामात १० लाख मॅट्रिक टनांपेक्षा जास्त ऊस गाळप केले आहे. शेतकरी, सभासद व कार्यक्षेत्र बाहेरील ऊस उत्पादक या सर्वांचा थोरात कारखान्यावर मोठा विश्वास आहे. या कारखान्याने यंदा कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना सतत सर्वाधिक भाव दिला आहे. यंदाचा गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपण समारंभ कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे व पत्नी मनीषा हासे, संचालक चंद्रकांत कडलग पत्नी वैशाली कडलग, मिनानाथ वर्षे व पत्नी हिरा वर्षे, भाऊसाहेब शिंदे व पत्नी पुष्पा शिंदे, विनोद हासे व पत्नी वैशाली हासे यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन पूजा होणार आहे. यावेळी तालुक्यासह अमृत उद्योग समूहातील संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शेतकरी, ऊस उत्पादक व सभासदांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here