मांजरा कारखान्याला सह्याद्री साखर कारखाना संचालकांची भेट

लातूर : सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने बुधवारी (१३ डिसेंबर २०२३) मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या अद्ययावत यंत्र सामुग्रीची पाहणी केली. मांजरा कारखान्यात १०० टक्के ऊस तोडणी यंत्राद्वारे होत आहे. ऊस गाळपाचे प्रमाण वाढले आहे. कारखान्याच्या गाळप आणि साखर उत्पादनाची पाहणी करण्यासाठी हे संचालक येथे आले होते. त्यांनी ऊस तोडणी व नियोजनाची माहिती घेतली.

मांजरा कारखान्यात मार्गदर्शक दिलीपराव देशमुख यांच्या विचारातून ऊस तोडणी यंत्र वापरण्याचा धोरणात्मक निर्णय काही वर्षांपूर्वी घेण्यात आला. अतिरिक्त उसाचा प्रश्न आणि ऊस तोडणी मजुरांची संख्या अपुरी असल्याने हा निर्णय घेतला होता. आता मशीनद्वारे उसाची तोडणी होत असल्याने वेळेवर गाळप होते, असे यावेळी सांगण्यात आले. सह्याद्री साखर कारखान्याच्या शिष्टमंडळात संजय कुंभार, कांतीलाल भोसले, वसंतराव कणसे, संतोष घाडगे, संजय थोरात, पांडुरंग चव्हाण, बजरंग पवार, दत्तात्रय जाधव, रामचंद्र पाटील, लहू जाधव, रामदास पवार, सुरज उदुगडे, माणिकराव पाटील, एस जी चव्हाण, जयवंत थोरात, सर्जेराव खंडाईत, संग्रामसिंह पाटील आदींचा सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here