सह्याद्री साखर कारखान्याचा वजन काटा अचूक असल्याचे प्रमाणपत्र

सातारा : यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी कारखान्याच्या कार्यस्थळावरील वजनकाट्याची शासकीय प्रतिनिधी, शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींच्या संयुक्त समितीने भेट देऊन पाहणी केली. समितीच्या सदस्यांनी विविध निकषांच्या आधारे वारंवार केलेल्या वजनावेळी अचूक वजन नोंदवण्यात आले. त्यामुळे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा वजनकाटा अचूक आणि विश्वासार्ह असल्याचे प्रशस्तिपत्र शासनाच्या समितीने दिले आहे.

सरकारी प्रतिनिधींकडून सातारा जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांच्या वजन काट्यांची तपासणी केली जात आहे. नाहब तहसीलदार बाजीराव पाटील, पुरवठा निरीक्षक महादेव आष्टेकर, वैधमापनशास्र निरीक्षक योगेश अग्रवाल, मंडल अधिकारी प्रशांत कोळी, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधींनी कारखाना कार्यस्थळाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी झालेल्या चाचणी वजन अचूक नोंदवण्यात येत असल्याचे या समितीला दिसून आले. तसा निष्कर्ष समितीने काढला व शेरा दिला. तलाठी रमेश लाखे, दत्तू पवार, लेखापरीक्षक ए.आर. कुंभार, लेखा परीक्षक एल. बी. माने, रयत क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष अशोक लोहार, विशाल पुस्तके, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, उपाध्यक्ष उत्तम साळुंखे, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील कोळी, दीपक पाटील, जनरल मॅनेजर पी. आर यादव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here