पाकिस्तानमध्ये युटिलिटी स्टोअरवरील साखर विक्री बंद

इस्लामाबाद : एआरवाय न्यूजच्या वृत्तानुसार युटिलिटी स्टोअर्स कॉर्पोरेशनने पंतप्रधानांच्या मदत पॅकेज अंतर्गत पाकिस्तानातील साखरेची विक्री थांबवली आहे. याबाबत प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, साखरेवर १५ रुपये प्रती किलो नवीन फेडरल एक्साईज ड्युटी (एफईडी) लागू झाल्याचा हा बदल झाला आहे. महामंडळाने फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यू (एफबीआर) कडून नव्या कराबाबत स्पष्टीकरण मागवले आहे. महामंडळाकडे साखरेचा पुरेसा साठा आहे, परंतु एफबीआरने एफईडीबाबत स्पष्टीकरण देईपर्यंत विक्री थांबवली आहे असे त्यांनी सांगितले. यूएससीच्या प्रवक्त्याने सांगितले की, एफबीआरने स्पष्ट निर्देश जारी करताच, साखरेची विक्री त्वरित पुन्हा सुरू होईल.

बेनझीर इन्कम सपोर्ट प्रोग्राम (बीआयएसपी)च्या ग्राहकांसाठी प्रती किलो साखरेची किंमत १०९ रुपये निश्चित करण्यात आली आहे, तर सर्वसामान्यांना ती १५५ रुपये प्रती किलो दराने विकली जाते. युटिलिटी स्टोअर्स कॉर्पोरेशन (यूएससी)ने १४१.२० रुपये प्रती किलो दराने १०,००० मेट्रिक टन साखर खरेदी केली होती. सूत्रांनी सांगितले की, युटिलिटी स्टोअर्स कॉर्पोरेशनने ४५,००० मेट्रिक टन निविदेअंतर्गत ४०,००० मेट्रिक टन साखर खरेदी केली. अर्थसंकल्पात पंतप्रधान आणि रमजान पॅकेजसाठी एकूण ६५ अब्ज रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी १० अब्ज रुपये पंतप्रधान रमजान रिलीफ पॅकेजसाठी तर उर्वरित ५५ अब्ज रुपये पंतप्रधान मदत पॅकेजसाठी देण्यात आले होते. याशिवाय चालू आर्थिक वर्षासाठी पंतप्रधान पॅकेज अंतर्गत ३५ अब्ज रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here