सांगली : तासगाव तालुक्यातील शिरगाव-विसापूर येथील शिरगाव ते राजापूर रस्त्यावर जुना बलवडी कालवा परिसरात शेतकऱ्यांचा पंधरा एकर क्षेत्रातील ऊस शॉर्टसर्किटने आग लागल्यामुळे जळाला. स्थानिक युवक, ग्रामस्थांनी तब्बल चार तासांनंतर आग आटोक्यात आणली. या आगीच्या प्रकाराची माहिती महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. आगामुळे १३ शेतकऱ्यांचे सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. सकाळी दहा वाजता लागलेली आग दुपारी साडेतीन वाजता आटोक्यात आली.
जुना बलवडी कालवा परिसरातील शेतांमधून महावितरण कंपनीच्या विजेच्या तारा गेल्या आहेत. काही ठिकाणी या तारा असल्यामुळे त्यांच्यामध्ये घर्षण होऊन ठिणगी पडून उसाला आग लागली. आगीत दीपक पाटील, कुलदीप पाटील, दत्तात्रय पाटील, वसंत पाटील, गणेश पाटील, शहाजी पाटील, शंकर पाटील, मोहन पाटील, काशिनाथ पाटील, सर्जेराव पाटील, अंकुश पाटील, दिलीप पाटील या शेतकऱ्यांचा आडसाली ऊस जळाला. अग्निशामक दलाचा बंब रस्त्याच्या अडचणीमुळे आत जाऊ शकला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी व युवकांनी ट्रॅक्टर उसाच्या मधूनच चालवून आग रोखण्याचा प्रयत्न केला.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.