सांगली : ऊसतोडणी कंत्राटदारांची २२.५७ लाखांची फसवणूक; पोलिसांत गुन्हा दाखल

सांगली : ऊस तोडणीसाठी मजूर पुरवठा करण्याची बतावणी करून कंत्राटदारांची २२ लाख ५७ हजार ४७५ रुपयांची फसवणूक झाल्याची घटना कडेगाव तालुक्यात घडली. या फसवणूकप्रकरणी चिंचणी-वांगी ठाण्यात तीन, तर कडेगाव पोलिसांत एक अशा सात संशयितांवर चार गुन्हे दाखल आहेत. चिंचणी-वांगी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाडळी (ता. कडेगाव) येथील ऊसतोडणी व वाहतूक कंत्राटदार हणमंत महादेव जाधव यांची ऊसतोडणी मजूर पुरवतो, असे सांगून संशयित ऊस तोडणी मुकादम बाळू पांडुरंग कुरुडे, सज्जन महादा मुकाडे (दोघे फेट्रा, ता. पुसद, जि. यवतमाळ) यांनी ७ लाख ८८ हजार ४७५ रुपयांची फसवणूक केली.

ऊसतोडणी व वाहतूक कंत्राटदार सुहास श्रीरंग जगताप (वडियेरायबाग, ता. कडेगाव) यांची संशयित मुकादम कैलास दत्ता चव्हाण (वय ३२), करण दता चव्हाण (२६, दोघे रा. बारडतांडा, जि. यवतमाळ), ज्ञानेश्वर माणिक वाघतकर (रुई, ता. मानोरा, जि. वाशिम) यांनी ७ लाख ९९ हजार रुपयांची फसवणूक केली. वडियेरायबाग येथील ऊस तोडणों व वाहतूक कंत्राटदार बाबासाहेब बबन पवार यांची संशयित ऊस तोडणी मुकादम श्रीराम रोडबा चव्हाण (५५, आडगाव, ता. पुसद, जि. यवतमाळ) याने ५ लाख रुपयांची फसवणूक केली. तोंडोली (ता. कडेगाव) येथील ऊसतोडणी व वाहतूक कंत्राटदार शंकर अनंत मोहिते यांची संशयित मुकादम विठू महादेव देडे (खमासवाडी, ता. कळंब, जि. धाराशिव) याने १ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here