सांगली : करूंगली – आरळा (ता. शिराळा) येथील डालमिया भारत शुगर युनिट (निनाईदेवी) या साखर कारखान्याचा गळीत हंगामाची सांगता झाली. कारखान्याने या हंगामात उच्चांकी ५ लाख २८ हजार ९१२ टन उसाचे गाळप केले आहे. कारखान्याचे युनिट हेड संतोष कुंभार, असिस्टंट जनरल मॅनेजर सुधीर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सांगता समारंभ झाला. कारखान्यातील सर्व विभागाने चांगल्या पद्धतीने केलेल्या कामाचे हे सांघिक यश आहे. त्यामुळेच पाच लाख २८ हजार टन गाळप यशस्वी केले, असे यावेळी युनिट हेड संतोष कुंभार यांनी सांगितले.
असिस्टंट जनरल मॅनेजर सुधीर पाटील म्हणाले, युनिट हेड कुंभार यांच्या मार्गदर्शन व कारखान्यातील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या टीम वर्कमुळे या हंगामात उंचाकी गाळप केले आहे. कार्यक्रमाला अधिकारी चिंतामणी पाटील, किरण पाटील, महेश कवचाळे, दुर्गेश तोमर, रणधीर चव्हाण, रविकुमार कर्नाटकी, राजेंद्र नाईक, नरेश देशमुख, निवृत्ती नायकवडी, ज्ञानदेव पाटील आदींसह कर्मचारी उपस्थित होते.