सांगली : गळीत हंगामाची समाप्ती, जिल्ह्यात ९७ लाख क्विंटल साखर उत्पादन

सांगली : जिल्ह्यातील यंदाच्या ऊस गळीत हंगामाची समाप्ती झाली आहे. एकूम १७ कारखान्यांनी आतापर्यंत ८७ लाख ११ हजार ४०८ टन उसाचे गाळप केले आहे. एकूण ९७ लाख ८३ हजार २३९ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सरासरी उतारा ११.२३ टक्के आहे. सर्वाधिक गाळप क्रांती कारखान्याने, तर सर्वात कमी गाळप खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथील यशवंत शुगर ॲण्ड पॉवर कारखान्याने एक लाख ३७ हजार १३३ टन उसाचे गाळप केले आहे. यंदा आटपाडीतील माणगंगा आणि कवठेमहांकाळ येथील महांकाली साखर कारखान्याने हंगामात सहभाग घेतला नाही.

कुंडल (ता. पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड साखर कारखान्याने या गळीत हंगामात विक्रमी १० लाख ६२ हजार ७६० टन उसाचे गाळप करून ११ लाख ४२ हजार ६१० क्विटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. साखर उतारा १९.८८ टक्के राहिला आहे. तर राजारामबापू पाटील साखर कारखान्याने जिल्ह्यात सर्वाधिक १२.६२ टक्के साखर उतारा घेतला आहे. सर्वांत कमी ८.५५ टक्के साखर उतारा एसजीझेड ॲण्ड एसजीए शुगर्स तासगाव कारखान्याचा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here