सांगली : रायगाव (ता. कडेगाव) येथील केन अॅग्रो कारखान्याने शेतकऱ्यांचे सहा वर्षांपासून उसाचे बिल दिले नसल्याने शेतकऱ्यांनी सोमवारी विटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष भक्तराज ठिगळे यांनी केले. यावेळी पोलिस व आंदोलकांत शाब्दिक चकमक झाली. निवेदनात म्हटले आहे कि, केन अॅग्रोने २०१८-१९ पासून गळितास आलेल्या शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे अद्यापही दिले नाहीत. पहिल्यांदा उसाची थकीत बिले द्यावीत व त्यानंतरच गाळप परवाना द्यावा.
यावेळी ठिगळे यांनी जोपर्यंत शेतकऱ्यांच्या उसाचे थकीत बिल १५ टक्के व्याजासह देत नाही तोपर्यंत नवीन गाळप परवाना देऊ नये, अन्यथा मोठा उद्रेक होईल, असा इशारा दिला.. यावेळी आंदोलकांनी नायब तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन दिले. या आंदोलनात रामचंद्र गायकवाड, माणिक जगताप, नामदेव काटकर, चंद्रकांत गायकवाड, सर्जेराव गायकवाड, शिवाजीराव पाटील, आनंदराव पाटणकर, शिवाजी निकम, पोपट पाखरे, बबन गोड, सुखदेव जगताप आदी सहभागी झाले होते.
ग्रीन पॉवर कारखाना ३१ ऑगस्टपर्यंत बिले देणार
गोपूज येथील ग्रीन पॉवर साखर कारखान्याने आतापर्यंत २ हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले आहेत. उर्वरित ५०६ रुपयांचे बिल येत्या ३१ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना तातडीने देत असल्याचे आश्वासन कारखाना व्यवस्थापनाने दिले.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.