सांगली : रशियातील पीजेएससी एक्रोन या कंपनीकडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील चिखली येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यास भेट दिली. त्यांनी कारखान्याने सहवीज निर्मिती प्रकल्पासाठी बसविलेल्या ‘एनकॉन’ कंपनीच्या ७ मेगावॅट क्षमतेच्या जनित्राची (टर्बाईन) माहिती घेतली. अशाप्रकारचे जनित्र (टर्बाईन) बसवणारा ‘विश्वास’ हा देशातील पहिला कारखाना आहे, अशी माहिती कारखाना व्यवस्थापक दीपक पाटील, तसेच अभियंता बाबा पाटील व सुरेश कांबळे यांनी दिली.
पीजेएससी एक्रोन कंपनीच्या क्रेडिट आणि गुंतवणूक समितीचे उपाध्यक्ष वसिली झत्सेपिन, तांत्रिक आधुनिकीकरण विभागाचे प्रमुख मिखाईल निकोलाव, इन्स्ट्रुमेंट तज्ज्ञ अलेक्से पेटुकोव्ह आदींचा सहभाग होता. पथकाने संचालक विराज नाईक यांची भेट घेतली. प्रारंभी कार्यकारी संचालक अमोल पाटील यांनी स्वागत केले. विराज नाईक यांनी मान्यवरांचा सत्कार केला.