सांगली : केंद्र सरकारचे सहकारी साखर कारखानदारीबाबतचे धोरण निश्चित नसल्यामुळे शेतकरी व साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. सहकारी साखर कारखानदारीबाबत केंद्र सरकारचे धोरण व दृष्टिकोन बदललेला नाही. जशी उसाची किंमत निश्चित केली जाते, तशीच साखरेची किंमत निश्चित होणे गरजेचे आहे. उसाला दिली जाणारी आधारभूत किंमत व त्यावर होणारा साखर निर्मितीचा खर्च आणि बाजारातील साखरेचा दर यांचा मेळ बसत नसल्याने कारखाने अडचणीत आहेत. साखरेचा दर ३ हजार ९०० पर्यंत हवा, असे मत विश्वासराव नाईक साखर कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले. चिखली येथे गळीत हंगाम २०२४-२५ साठी आमदार मानसिंगराव नाईक व त्यांच्या पत्नी सुनीता यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ झाला. उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक उपस्थित होते.
बॉयलर विभागातील कर्मचाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला. बॉयलर कर्मचारी विलास पाटील यांनी सपत्निक विधिवत पूजन केले. संचालक विजयराव नलवडे यांनी प्रास्ताविक केले. संचालक शिवाजी पाटील यांनी आभार मानले. संचालक दिनकरराव पाटील, हंबीरराव पाटील, विश्वास कदम, विश्वास पाटील, सुरेश चव्हाण, सुरेश पाटील, बिरुदेव आमरे, बाबासाहेब पाटील, बाळासाहेब पाटील, सुकुमार पाटील, विष्णू पाटील, अजितकुमार पाटील, सुहास घोडे-पाटील, संदीप तडाखे, तुकाराम पाटील, यशवंत दळवी, कोंडिबा चौगुले, कामगार संचालक दत्तात्रय पाटील, कार्यकारी संचालक अमोल पाटील, दीपक पाटील, सचिन पाटील, टी. एम. साळुंखे, विजय पाटील, विजयराव देशमुख, यु. जी. पाटील उपस्थित होते.