सांगली : राजारामबापू पाटील कारखान्यास सहवीजनिर्मितीबद्दल पुरस्कार

सांगली : देशातील सहवीजनिर्मिती प्रकल्पांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने पुणे येथील शानदार सोहळ्यात राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्यास सर्वोत्कृष्ट सहवीजनिर्मिती प्रकल्प पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी पुरस्कार स्वीकारला. माजी मंत्री आमदार जयंत पाटील उपस्थित होते.

को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष दांडेगावकर, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, शास्त्रज्ञ डॉ. संगीता कस्तुरे, प्रतापराव पवार, ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, दिनेश जगदाळे, नरेंद्र मोहन, संजय खताळ यांच्यासह सहकार क्षेत्रातील दिग्गज समारंभास उपस्थित होते. कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, संचालक प्रदीपकुमार पाटील, कार्तिक पाटील, शैलेश पाटील, दादासो मोरे, दिलीपराव देसाई, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, जनरल मॅनेजर एस. डी. कोरडे, जनरल मॅनेजर विजय मोरे, को-जन. मॅनेजर उमेश सुतार उपस्थित होते. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य, देशात यशस्वी घौडदौड करीत वसंतदादा इन्स्टिट्यूट व राज्य साखर संघाचे अनेक पुरस्कार पटकावलेत. संचालक मंडळ, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांच्या सांघिक प्रयत्नांचे यश आहे, अशी भावना अध्यक्ष पाटील यांनी व्यक्त केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here