सांगली : राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या वाटेगाव-सुरुल शाखेने गेल्या २१ वर्षांपासून साखर उद्योग क्षेत्रात यशस्वी वाटचाल करीत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही गळीत हंगाम यशस्वी होईल असा विश्वास राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील यांनी व्यक्त केला. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वाटेगाव-सुरुल शाखेतील रोलर पूजन समारंभात ते बोलत होते. कारखान्याचे संचालक देवराज पाटील, अतुल पाटील, दिपक पाटील, रामराव पाटील, चीफ इंजिनिअर संताजी चव्हाण, चीफ केमिस्ट संभाजी सावंत उपस्थित होते.
विजयराव पाटील यांच्या हस्ते वाटेगाव- सुरुल शाखेत विधिवत रोलर पूजन करण्यात आले. आपल्या शाखेत ऑफ सिझन कामे सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले. गळीत हंगामात आ. जयंतराव पाटील, कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाखेचे उद्दिष्ट नक्की पूर्ण करू, असे ते म्हणाले. संताजी चव्हाण यांनी स्वागत केले. अनिल पाटील, शिवाजी चव्हाण, वैभव पाटील, सचिन पडळकर, ए. बी. पाटील, आनंद पाटील, संभाजी शेखर, पतंग वांगीकर, संजय पाटील, सरदार भालकर आदी उपस्थित होते.