सांगली : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारखान्यातर्फे दिवाळीसाठी १९ टक्के बोनस देण्यात येणार आहे. साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी ही माहिती दिली. या बोनसचा लाभ चारही युनिटमधील १ हजार ९१९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना होणार आहे. कामगार युनियनशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला असून बोनसची रक्कम १० कोटी ८० लाख रुपये २४ ऑक्टोबर रोजी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे.
बोनसच्या निर्णयासंदर्भात आयोजित बैठकीला उपाध्यक्ष विजयराव पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे सरचिटणीस शंकरराव भोसले, वाळवा तालुका राष्ट्रीय साखर कामगार संघाचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, कार्याध्यक्ष तानाजीराव खराडे, कामगार कल्याण अधिकारी महेश पाटील, एचआर मॅनेजर अनिलकुमार पाटील, मुख्य लेखापाल संतोष खटावकर प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान, कारखान्याने सातत्याने कामगारांच्या हिताची जपणूक केली आहे. सध्या ऑफ सिझनची कामे गतीने सुरू आहेत. कारखाना वेळेवर सुरू करून ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा गळीत हंगाम यशस्वी करू, असा विश्वास प्रतीक पाटील यांनी व्यक्त केला.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.