सांगील : गेल्या गळीत हंगामातील ऊस बिलाचा १०० आणि ५० रुपयांचा फरक द्या, असा सरकारचा आदेश असताना त्याकडे जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी पाठ फिरवली आहे. आधीच हातातोंडाशी आलेला खरीप पावसाने मातीमोल झाला. त्यामुळे यावर्षीच्या दिवाळीचे स्वप्न अपुरे राहणार आहे. यंदा हातातोंडशी पीक आले असताना परतीच्या पावसाने हजेरी लावली आणि शेतातील पीक पाण्यात बुडाले, काही ठिकाणी कोंब आले. काहीशी हाताला लागले आहे.
ऍग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पूर्वी साखर कारखानदार दिवाळीसाठी ऊसबिल काढायचे. आता एफआरपी या मुद्याप्रमाणे बिल देत आहेत. साखरेला बाजारपेठेत चांगला दर मिळत असताना जादा दर देण्याची भूमिका कोणत्याही कारखान्याची नाही. गतवर्षीच्या गाळप हंगामातील तीन हजारांच्या आत व तीन हजारांच्या पुढे दर देणाऱ्या कारखानदारांनी ५० व १०० रुपयांचा फरक द्यावा, असा आदेश राज्य सरकारने यापूर्वीच काढला आहे. त्या आदेशाला कारखान्यांनी केराची टोपली दाखवली. याबाबत बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक बी. जी. पाटील म्हणाले की, शेतकरी रोजच मरण अनुभवत आहेत. शेतकऱ्यांच्या दुखण्याकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही. राजकीय नेते आणि आणि प्रशासन त्यांना लुटत आहे. तरुण पिढीतील शेतकऱ्यांनी यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.