सांगली : यंदाच्या गळित हंगामासाठी तासगाव साखर कारखाना सुरू राहण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. माजी मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या खासगी कंपनीकडे हा कारखाना भाडेकरारावर देण्यात आला आहे. पाटील यांच्या कंपनीकडून आगामी गळीत हंगामाची पूर्वतयारी सुरू आहे. सुरुवातीपासून राजकारणाच्या वादात अडकलेला कारखाना अलिकडेच माजी खासदार संजय पाटील यांच्या एसजीझेड अँड एसजीए शुगर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे होता.
राजकीय कुरघोड्यांमुळे २०१३-१४च्या गळीत हंगामापासून बंद असणारा हा कारखाना २०२०-२१ मध्ये पुन्हा मोठ्या संघर्षातून सुरू झाला. माजी खासदार संजय पाटील यांच्या एस जी झेड अँड एस जी ए शुगर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने गळीत हंगाम सुरू केला. त्यानंतर पुन्हा २०२१ – २२ आणि २२- २३ या दोन गळित हंगामात कारखाना बंद पडला. २०२३-२४ मध्ये अडचणी आल्यानंतर उगार शुगर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने उर्वरीत गळीत हंगाम चालवला. उगार शुगर कंपनीने सर्व शेतकऱ्यांची ऊस बिले ३१५० प्रती मेट्रिक टन याप्रमाणे अदा केली आहेत. गळीत हंगामासाठी उगार शुगर कंपनीने पूर्वतयारी सुरू केली होती. मात्र, अचानक माजी मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी गळित हंगाम सुरू करण्यासाठी कारखान्यामध्ये कामकाज सुरू केले आहे.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.