सांगली : ऊस शेतीमध्ये ‘एआय’ वापरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याची विश्वास साखर कारखान्याची योजना

सांगली : ऊस शेतीमध्ये कृत्रीम बुद्धिमत्तेचा (एआय) सुरू झाला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या वापराने ४० टक्के उत्पन्न वाढ तर, ३० टक्के उत्पादन खर्चात बचत झाल्याचे सिद्ध झाले आहे. शिवाय ऊस शेत जमिनीमधील अचूक व आधुनिक माहिती मिळते. त्यामुळे ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणाऱ्यांना अनुदान देण्याचा संचालक मंडळाचा विचार आहे, असे विश्वासराव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी सांगितले. चिखली येथील कारखान्यात बारामतीच्या ग्रीनकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे कृषी विज्ञान केंद्र व नेटाफिम कंपनीच्या सहकार्याने कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान व भविष्यातील ऊस शेती विषयावर स्मार्ट शेतकरी संमेलन झाले. यावेळी ते बोलत होते. उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-सरुडकर प्रमुख उपस्थित होते.

अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी सांगितले की, या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी गुंठ्यात समूह शेतीचा प्रयोग राबविण्याचा विचार संचालक मंडळ करत आहे. फायदेशीर व अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी काळ बदलतोय तसे शेतकऱ्यांनीही बदलण्याची गरज आहे. यावेळी नेटाफिमचे कृषितज्ज्ञ अरुण देशमुख यांनी डोंगराळ असलेल्या शिराळा व शाहूवाडी विभागातील शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा वापर करावा असे आवाहन केले. बारामती कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. संतोष देशमुख यांनी मार्गदर्शन केले. एआय तंत्रातून ऊस शेती जमिनीत कशाची आवश्यकता आहे, याची नेमकी माहिती या तंत्रज्ञानाच्या वापरातून मिळते. रामती येथील प्रयोगात एकरी १५० टनापर्यंत उसाचे उत्पन्न मिळाले आहे असे सांगितले. कारखान्याचे संचालक विराज नाईक यांनी प्रास्ताविक केले. कार्यकारी संचालक अमोल पाटील, आजी-माजी संचालक, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. संचालक शिवाजी पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here