सांगली : ‘भारती शुगर्स अँड फ्युएल्स’मध्ये ५० हजाराव्या साखर पोत्याचे पूजन

सांगली : नागेवाडी (ता. खानापूर) येथील भारती शुगर्स अँड फ्युएल्स प्रायव्हेट लि. कारखान्यात गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये उत्पादित झालेल्या ५० हजाराव्या साखर पोत्याचे पूजन रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व सांगली जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड व कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश लाड यांच्या हस्ते झाले.

कारखान्याचा गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू झाला असून आजअखेर ४७ हजार ७१० टनाचे गाळप होऊन ५१ हजार २९५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा ११.०५ टक्के मिळाला आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस गळितास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन महेंद्र लाड यांनी केले.

दरम्यान, श्री दत्त जयंती व साखर पोतीपूजन कार्यक्रमानिमित्त कर्मचारी, ऊस वाहतूक कंत्राटदार, वाहनचालक, तोडणी मजूर यांच्यासाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी आर. डी. पाटील, चिफ इंजिनिअर एम. एस. पाटील, चिफ केमिस्ट व्ही. पी. सूर्यवंशी, मुख्य शेती अधिकारी एस. जे. मोहिते, ऊस पुरवठा अधिकारी व्ही. एस. पाटील, ए. ए. पाटील, पी. डी. सुतार, एम. एम. पवार, ए. ए. स्वामी, तुषार लाड, एस. ए. ठोंबरे, आर. आर. लाड, ए. ए. खारगे, निरंजन कुलकर्णी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here