बुलंदशहर : साबितगड येथील त्रिवेणी साखर कारखान्याने कारखाना परिसर तसेच परिसरातील अनेक गावांमध्ये डोअर टू डोअर सॅनिटायझेशन आणि धूर फवारणीची मोहीम राबवली.
कोरोना महामारी पसरल्याने कारखान्याच्या वतीने अटेरना, दीघी, करौरा, साबितगड, हिंसोटी, बनैल यासह परिसरातील अनेक गावांमध्ये सॅनिटायझेशन आणि फॉगिंगची मोहीम राबविण्यात आली. कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक नरेश पाल यांनी सांगितले की, कोरोनाचा फैलाव पाहता कारखान्याने सर्व्हे टीम एकत्र केल्या. त्यांना धूर फवारणी आणि सॅनिटायझेशन मशीन देऊन आसपासच्या गावांमध्ये मोहीम राबविण्याची सूचना केली. कारखान्याचे प्रशासन अधिकारी सज्जन पाल सिंह आणि आसवनीचे वरिष्ठ व्यवस्थापक संजय मिश्र यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या मोहिमेचे ग्रामस्थांनी कौतुक केले. कारखाना प्रशासनाने लोकांना गरज असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन केले आहे. याशिवाय मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याची सूचना करण्यात आली आहे.