मुजफ्फरनगर : मन्सूरपूरमध्ये धामपूर साखर कारखान्याच्यावतीने रविवारी कारखाना परिसरासह परिसरातील गावांत सॅनिटायझेशन करण्यात आले. कारखान्याने परिसरासह मन्सूरपूर रेल्वे स्टेशन, ऊस समिती, को-ऑपरेटिव्ह बँक, गावातील मंदिर, मशिद, चौधरी चरणसिंह यांचा पुतळा परिसर, रेल्वे पार कॉलनी, बाजार आणि एटीएम सेंटरमध्येही सॅनिटायझेशन केले.
कारखान्याच्यावतीने यापुढील काळातही अशी मोहीम सुरू राहील असे कारखान्याचे उपाध्यक्ष अरविंद कुमार दीक्षित यांनी सांगितले. कारखाना प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे परिसरात ऑक्सिजन प्लांट स्थापन करण्यास परवानगी मागितली आहे. यासाठी प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. तर कारखान्याकडून ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर प्रशासनास देण्यासाठी परवानगी मागितली आहे.
दरम्यान, मोरनातील छछरौली गावात नूतन सरपंचांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने गल्लोगल्ली कीटकनाशक फवारून सॅनिटायझेशन केले. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी महिला सरपंचांच्या कामाचे कौतुक केले. सरपंच कविता राठी यांचे पती नीरज आणि ग्रामस्थांनी ही मोहीम राबवली. बिडीओ प्रभात कुमार श्रीवास्तव, सहायक विकास अधिकारी चंद्रप्रकाश शर्मा यांनी त्यांचे कौतुक केले.