फोंडा : संजीवनी साखर कारखान्याच्या कामगारांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यासह विविध प्रलंबित मागण्यांबाबत एक सप्टेंबरपासून संपावर जाण्याचा इशारा या कामगारांनी दिला आहे.
साखर कामगारांनी सांगितले की, त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे गणेश चतुर्थीपूर्वी थकीत पगार आणि प्रलंबित मागण्या सोडविण्याची मागणी केली होती. सध्याच्या प्रशासकांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोपही या कामगारांनी केला आहे.
हेराल्ड गोवा डॉट इन मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, कर्मचाऱ्यांनी सांगितले की, थकीत वेतन न मिळाल्याने बहुतांश कामगारांची कर्जे थकली आहेत. कामगारांना बॅंकांकडून हप्ते भरण्यासाठी पत्रे आली आहेत. आतापर्यंत नियुक्त केलेल्या सर्व प्रशासकांनी आम्हाला वेळेवर पगार, भत्ते आणि इतर सुविधा दिल्या आहेत. मात्र सध्याचे प्रशासक वित्त विभागाकडून अनुदान, भत्ते आणि वेतन मिळावे यासाठी ठोस पावले उचललेली नाहीत असा या कामगारांचा आरोप आहे. संजीवनमध्ये जवळपास १०७ कायम कर्मचारी असून त्यापैकी ७० कर्मचाऱ्यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार विविध सरकारी हॉस्पिटलमध्ये कोविड १९ अंतर्गत काम केले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link