पोंडा(गोवा): संजीवनी साखर कारखान्याच्या शेतकर्यांनी मंगळवारी 25 सप्टेंबरपूर्वी तीन प्रलंबित मगण्यांवर लिखित अश्वासन देण्यामध्ये अपयशी ठरल्यावर 29 सप्टेंबर पासून अनिश्चितकालीन संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. शेतकरी नेते राजेंद्र देसाई यांच्या नेतृत्वामध्ये शेतकर्यांनी धानकौडा स्थित साखर कारखाना परिसरात एक बैठक़ घेतली, ज्यामध्ये त्यांनी आपल्या समस्यांवर चर्चा केली. यामध्ये देसाई यांनी मागणी केली की, सरकार कडून त्यांना 25 सप्टेंबर पूर्वी त्यांच्या प्रलंबित मागण्यांवर एक लिखित अश्वासन दिले जात नाही, तोपर्यंत आम्ही लढू. आमचे कुटुंब प्रलंबित थकबाकीमुळे उपजिविकेसाठी संघर्ष करत आहेत. देसाई यांनी सांगितले की, शेतकर्यांचे कर्जाचे हप्ते प्रलंबित आहेत. ते पुढे म्हणाले की, आमची पहिली मागणी आहे की, सरकारने आम्हाला साखर कारखान्याच्या भविष्याबाबत लिखित स्वरुपात द्यावे. मग कारखाना बंद करण्याचा निर्णय असो वा सुरु करण्याचा. त्यांनी सांगितले की, शेतकरी संजीवनी कारखान्याच्या अनिश्चित भविष्यामुळे वैतागले आहेत. आणि कारखाना सुरु हाईल की बंद होईल याबाबत सरकारचे मत स्पष्ट करण्याच्या प्रतिक्षेत आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.