फोंडा : संजीवनी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी शुगर वेज बोर्डाची थकबाकी आणि २०२०-२१ सानुग्रह अनुदानाशी संबंधीत मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. कर्मचाऱ्यांनी कारखान्याचे प्रशासक चिंतामणी पेर्णी यांना नोटीस जारी केली असून गणेश चतुर्थीपूर्वी थकबाकी मिळावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, कृषी विभागाला या मागण्यांबाबत तोडगा काढण्यास अपयश आल्याने बुधवारी कर्मचारी संपावर गेले. एप्रिल २०१४ ते मार्च २०१९ पर्यंतची थकबाकी द्यावी अशी कामगारांची दुसरी मागणी आहे. कारखान्यांनी प्रशासकांकडे याबाबत लेखी आश्वासन देण्याची मागणी केली. कारखान्याचे प्रवेशद्वार अडवून धरत अधिकाऱ्यांची वाहने बाहेर पडू दिली नाहीत.
धारबांदोडाचे तहसीलदार कौशिक देसाई आणि फोंड्याचे पोलिस निरीक्षक मोहन गावडे यांनी कर्मचाऱ्यांसोबत या मुद्यावर चर्चा केली. कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पीडब्ल्यूडी खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर यांची भेट घेतली. कृषी मंत्र्यांना भेटण्याबाबत वेळ निश्चित करावी अशी मागणी त्यांनी केली. मंत्री पाऊसकर यांनी या भेटीची व्यवस्था केली असून कृषी मंत्र्यांच्या बैतूल येथील निवासस्थानी ही बैठक होणार आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link