फोंडा : जवळपास पाच दशकांहून जुन्या असलेल्या आणि गेल्या काही वर्षांपासून तोट्यात चालणाऱ्या संजवनी साखर कारखान्याला नफ्यात आणण्यासाठी इथेनॉल उत्पादनाबाबत विचार केला जात आहे. कारखान्याचे प्रशासक चिंतामणी पेर्नी यांनी पुण्यातील डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनला इथेनॉल उत्पादनाबाबत एक सविस्तर अहवाल तयार करण्यास सांगितल्यानंतर या विषयावर चर्चा सुरू झाली आहे.
पेर्णी म्हणाले, स्पर्धा वाढल्याने साखर उत्पादन हे आता नफा मिळविण्यासाठी पुरेसे नाही. इथेनॉलची मागणी खूप आहे. पेट्रोलियम कंपन्यांना राज्यात इथेनॉल पुरवठा करण्यासाठी हा सक्षम पर्याय होऊ शकेल. कारखान्यात ४० केएलडी इथेनॉल उत्पादनाचे युनिट सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. आम्ही ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत, सुरुवातीच्यातीन महिन्यात स्थानिक उसाचा वापर करण्याचा विचार करीत आहोत. त्यानंतर जानेवारी ते मार्चपर्यंत कर्नाटकातून ऊस उपलब्ध होईल. त्यानंतरच्या पुढील तीन महिन्यांसाठी, एप्रील ते जून या कालावधीत इथेनॉल उत्पादनासाठी रसाचा वापर केला जाईल.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link